Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पोलिसांवर गोळीबार करणारे दोघेही मालेगाव पोलिसांना शरण...

दि . 22/03/2022

सराईत गुन्हेगार - जमाल बिल्डर व सलमान

शहरात लूम कारखानदाराचे अपहरण करुन त्याला २८ हजारांना लुटल्याप्रकरणी पोलीस शोध घेत असलेल्या दोन संशयित सराईत गुन्हेगारांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवरच गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला होता. सुदैवाने या हल्ल्यात दोन पोलीस बचावले होते. पोलीस या दोघा सराईत गुन्हेगारांच्या शोधात असतांना सोमवारी  दुपारी दोन ही सराईत गुन्हेगार मालेगाव पोलिसांना शरण आले.


ताज्या बातम्या