Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावच्या अवघ्या १० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण; लसीकरण मोहिमेत प्रशासन अपयशी..

दि . 22/03/2022

मालेगाव : कोरोना संसर्ग आजाराच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात आतापर्यंन्त कोविड नियमांची सर्रासपणे पायमल्ली केली जाते. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना पूर्वभागातील नागरिक जुमानत नाहीत. कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत मालेगाव शहराचा लसीकरणाचा टप्पा अत्यल्प असल्यामुळेच नाशिक जिल्ह्याचे निर्बंध अद्याप हटविण्यात आलेले नव्हेत. नागरिकांपाठोपाठ येथील विद्यार्थी देखील लसीकरणाबाबत उदासिन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्व भागातील शाळा महाविद्यालयांमधील अवघ्या १० टक्केच विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले असून अनेक शिक्षकांचे देखील लसीकरण अपूर्ण आहे. लसीकरण अभियान राबविण्यात येथील प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या आदेशानंतर मालेगाव शहरात लसीकरणासाठी मनपा, महसूल, पोलीस अशा संयुक्त पथकाकडून लसीकरणाची व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील पूर्व भागात असलेल्या अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये हे पथक लसीकरणासाठी गेले असता तेथील अवघ्या दहा टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याची माहिती मिळाली. पथकाने संबंधित शाळा मुख्यध्यापक, प्राचार्य यांना लसीकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रशासनाने आम्हाला पत्र द्यावे, त्या पत्रावर विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा केल्यानंतरच लसीकरणाबाबत निर्णय घेवू, असा अजब उत्तर दिल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. लसीकरणासाठी राज्यशासानाचे सक्त आदेश असतांना देखील येथील उर्द शाळा महाविद्यालयांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.

-----------

शाळा महाविद्यालयांमधील लसीकरणाची आकडेवारी

 जेएटी हायस्कूल विद्यार्थी संख्या (८२३), लसीकरण झालेली संख्या (१२५)

एटीटी हायस्कूल विद्यार्थी संख्या (१०८०), लसीकरण झालेली संख्या (८२)

सीटी हायस्कूल विद्यार्थी संख्या (२५०), लसीकरण झालेली संख्या (४५)

डीएड महाविद्यालय विद्यार्थी संख्या (९०), लसीकरण झालेली संख्या (४५)

या महाविद्यालयांमधील शिक्षकांची संख्या (१००) लसीकरण झालेल्या शिक्षकांची संख्या (५०)


ताज्या बातम्या