Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




जिल्हाधिकाऱ्यांच्या कानउघाडणी नंतर मनपा,पोलीस,महसूल प्रशासनाने दिवसभरात केले १६ जणांचे लसीकरण; मालेगावाच्या अत्यल्प लसीकरणामुळे जिल्हा निर्बंधमुक्त होईना..

दि . 17/03/2022

चार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवसभरात केले १६ जणांचे लसीकरण..
मालेगाव : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केल्यानंतर गुरुवारी मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी सकाळपासून लसीकरण मोहिमेला रिंगणात उतरले होते. मात्र दिवसभरात या चार ही मोठ्या अधिकाऱ्यांनी अवघ्या १६ जणांचे लसीकरण करुन आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मालेगाव शहरात लसीकरणाची टक्केवारी अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध जैसे थै आहेत. त्यामुळे निर्बंध शिथील करायचे असतील तर कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे, असे निर्देश नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले. यानंतर येथील अधिकाऱ्यांनी शहरात व्यापक मोहिम सुरु केली आहे. यंत्रमाग कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी लसीकरण न केल्याचे निर्दशनात येताच कारखाना सील करण्यात आला. मात्र कर्मचाऱ्यांचे तत्काळ लसीकरण झाल्याने कारखाना पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आला. मात्र चार ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी दिवसभरात मालेगावात अवघ्या १६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अशा गतीने जर लसीकरणाची व्यापक मोहीम सुरु राहिली तर पूर्ण शंभर टक्केचा आकडा गाठण्यासाठी मालेगावकरांना किती वर्षांची वाट बघावी, लागले, असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकरांना पडला आहे.


ताज्या बातम्या