Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वखारी हत्याकांडातील आरोपींना मोक्का; वखारी हत्याकांडातील चौघांसंशयितांसह ९ सरहराईतांना मोक्का..

दि . 16/03/2022

संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी उचलले कठोर पाऊल..

गोळीबार प्रकरणातील ६ जणांवर मोक्का..

राज्यभरात गाजलेल्या नाशिक जिल्ह्यातील नंदवाच्या वखारी हत्याकांडातील तिघां संशयितांसह पवारवाडी पोलीसस्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून एकाची हत्या करणाऱ्या ६, अश्या संघटतीत गुन्हेगारी करणाऱ्या ९ संशयितांवर मोक्का लावण्याचे कठोर पाऊल पोलिसांनी उचलले आहे. 

घराबाहेर झोपलेल्या एकाच कुटुंबातील लेकरांसह चौघांची गळा चिरुन करण्यात आली होती निर्घृण हत्या..

आरोपी:  जलालुद्दिन कमालउद्दीन कुरेशी उर्फ आरिफ कुरेशी, मोहम्मद अक्रम मोहम्मद सुलेमान, मोहम्मद साजिद मोहम्मद सगीर, सखाहारी उर्फ सखाराम चव्हाण व सचिन भोसले

मालेगाव विभागातील पवारवाडी पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाणे येथे दाखल गंभीर गुन्ह्यातील एकूण ५ आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती येथील अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून मोक्का कलमाअंतर्गत पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे. तालुका पोलीस ठाणे हद्दीत ऑगस्ट २०२० मध्ये वखारी ते जेऊर रस्त्यावर हत्याकांड घडले होते. तसेच पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत जुलै २०२१ मध्ये मुंबई आग्रा महामार्गावर लुटमार व जीवे ठार मारण्याचा गुन्हा घडला होता. या दोन्ही प्रकरणात पवारवाडी व तालुका पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३९७, २०१ अंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरु होता. तपासादरम्यान गुन्हेगारांनी अग्नीशस्त्रांचा धाक दाखूवन लुटमार करणे, जीवे ठार मारणे असे प्रकार केल्याचे समोर आले होते. तसेच संघटीत टोळीने हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस महानिरीक्षकांडे मोक्का अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यास मंजुरी मिळाली आहे. त्या अंतर्गत संशयित आरोपी जलालुद्दिन कमालउद्दीन कुरेशी उर्फ आरिफ कुरेशी, मोहम्मद अक्रम मोहम्मद सुलेमान, मोहम्मद साजिद मोहम्मद सगीर, सखाहारी उर्फ सखाराम चव्हाण व सचिन भोसले या पाचही आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. अजून काही संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.


ताज्या बातम्या