Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वनविभागाच्या जमिनीवर व्यवसाय थाटण्याची तयारी मालेगाव तालुक्यातील प्रकार..

दि . 14/03/2022

मालेगाव : तालुक्यातील डोंगराळे गावाच्या शिवारात जेतोबा देवस्थान असून हा संपूर्ण परिसर वनविभागाच्या हद्दीत येतो. मात्र या ठिकाणी एका हॉटेल व्यावसायिकांने हॉटेलचे बांधकामाला सुरुवात केली आहे. नियमित रहदारीचा रस्ता असलेल्या या भागात वनविभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत संबंधित व्यावसायिकांने हॉटेल थाटण्याची तयारी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क केला असता संबंधित हॉटेल व्यावसायिकावर कारवाई करणार असल्याची माहिती वनविभागाचे जगदीश एडलावरकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे शिवारात वनविभागाची मोठी जमिन आहे. याभागात जैतोबा देवस्थान असून याठिकाणी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील भाविका दर्शनासाठी नियमित येत असतात. हा संपूर्ण परिसर डोंगराळ असल्याने या भागात हॉटेल व्यवसायाला संधी लक्षात घेवून एका व्यावसायिकाने बेकायदेशीर हॉटेल उभारणीच्या कामाला सुरुवात केली. मात्र याबाबत वनविभागाला कुठलीही पूर्वकल्पना न देता थेट वनविभागाच्या जमिनीवरच हॉटेलचे बांधकाम सुरु केले आहे. याभागात येणाऱ्या भाविकांनी तसेच येथील काही ग्रामस्थांच्या नजरेत हा प्रकार पडल्याने या बांधकामाची चर्चा झाली.


ताज्या बातम्या