Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कृषिमंत्र्यांसह सत्ताधारी शिवसेना ईदगाह मैदानाचा ठराव रद्द करण्यासाठी थेट नगरविकासमंत्र्यांच्या भेटीला..

दि . 12/03/2022

मालेगाव शहराचा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॉलेज मैदानाची जागा ईदगाह ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा ठराव महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमताच्या जोरावर मंजूर केला. यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. आता महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने ईदगाह मैदानाचा ठराव रद्द व्हावा यासाठी थेट नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. 

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची कृषिमंत्री दादा भुसे यांच्या समवेत उपमहापौर निलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, संजय दुसाने, मनोहर बच्छाव आदींसह शिवसेना शिष्टमंडळाने शुक्रवारी ( दि.११) विधिमंडळात भेट घेतली.या भेटीदरम्यान मंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करीत महापालिकेत करण्यात आलेला ठराव बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. कॉलेज मैदानाची जागा ही शासनाची असुन महापालिकेचा या जागेशी काही एक संबंध नसतांना महासभेच्या विषय पत्रिकेत विषय घेवुन ठराव मंजुर करणे हे घटनाबाह्य आहे. या विषयाची चौकशी कारवाई. व विषय क्र. 319 चा मंजुर करण्यात आलेला ठराव हा बेकायदेशीर असून तो विखंडीत (रद्द) करावा. तसेच सदर जागेवरील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेशी केलेला करारनामा देखील रद्द करण्यात येवुन ती जागा महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनासोबत शिवसेना शिष्टमंडळाने या जागेशी संबधित काही कागदपत्रे देखील दिली असून कॉलेज मैदानाचा प्रश्न पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापल्याचे पाहायला मिळते आहे.


ताज्या बातम्या