Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरण देवराजन यांनी सुरज मांढरे यांच्याकडून स्वीकारला पदभार

दि . 11/03/2022

मालेगाव (जय योगेश पगारे) नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मावळते जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या मुख्य दालनात हा सोहळा पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी राजेश साळवे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, नितीनकुमार मुंडावरे, गणेश मिसाळ, भीमराज दराडे, वासंती माळी, नितीन गावंडे, निलेश श्रींगी, ज्योती कावरे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत पवार, राजेंद्र नजन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या