Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जे ए टी महिला महाविद्यालयात नॅशनल वेबिनार..

दि . 10/03/2022


मालेगाव, 
मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि विकास समिती , इंग्रजी विभाग आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते . महिला आणि स्वसंरक्षण (विमेन अँड सेल्फ डिफेन्स) या विषयावर सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  सदर परिसंवाद हा गुगल प्लॅटफॉर्म द्वारा आयोजित करण्यात आला होता. परिसंवादासाठी  उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांनी केले . आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी सध्याच्या युगात महिलांना स्वसंरक्षणाचे धडे मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले .महिला सुरक्षा आणि विकास समितीच्या समन्वयक आणि इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापिका सुनेत्रा मेश्रामकर यांनी प्रास्ताविक केले. महिला आणि मुलींवरील होणाऱ्या अत्याचाराचे आणि छेडखानी चे प्रमाण सध्या भयावह रितीने वाढत आहे आणि या पार्श्वभूमीवरच  महिलांना आणि मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. ऑनलाईन माध्यमातून आयोजित सदर परिसंवादातील प्रथम सत्रात  महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन केले. संरक्षणाचे महत्त्व या विषयावर त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीनी स्वतःचे संरक्षण कशा प्रकारे करावे आणि काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कशाप्रकारे सामोरे जावे याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. वेबिनार च्या द्वितीय सत्रात डॉ. शैलजा अरविंद सांगळे, पुणे यांनी मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत होणाऱ्या छेडखानीस कशाप्रकारे सामोरे जावे आणि त्याचा कशा प्रकारे प्रतिकार करावा याबद्दल उपयुक्त असलेल्या टीप्स दिल्या.  वेबिनारच्या  तृतीय सत्रात महाविद्यालयाच्या मार्शल आर्ट प्रशिक्षित विद्यार्थिनींनी प्रशिक्षण दिले. कु. खान अलमास  तन्वीर खान आणि कु. नौशाबा जुबैर अहमद  या दोन विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे धडे दिले छेडखानीच्या घटना कशा सामोरे जावे याबाबत प्रशिक्षण दिले . त्याचप्रमाणे आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचा स्वसंरक्षणासाठी कशा प्रकारे वापर करावा याबाबत प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. फर्जाना यांनी केले . प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि वेबिनारचा  समारोप झाला. सदर वेबिनार च्या यशस्वीतेसाठी प्रा.नवीद अख्तर, प्रा. अताउर रहमान नूरी, मि. मोमीन हसीब, कु. अन्सारी मनताशा मोहम्मद आरिफ, कु. नौशिन जाविद अख्तर, कु. अनिबा बानो मोहम्मद सलीम यांनी परिश्रम घेतले.


ताज्या बातम्या