Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सराईत गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार मालेगावातील धक्कादायक प्रकार..

दि . 10/03/2022

मालेगाववात दोन दिवसांपूर्वी एका लूम कारखानदाराचे अपहरण करुन त्याला २८ हजारांना लुटल्याची घटना मालेगावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित गुन्हेगाराला बेड्या घातल्या असून त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संशयिताने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला. सुदैवाने या गोळीबारात दोन पोलिसांचे प्राण बचावले.
मालेगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीला अळा घालण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. यात स्थानिक गुन्हे शाखेची भूमिका लाख मोलाची आहे. दोन दिवसांपूर्वी लूम कारखानदाराचे अपहरण करुन त्याला २८ हजारांना लुटले होते. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित तत्काळ एकाला अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अन्य दोघांना पकडण्यासाठी बुधवारी रात्री सापळा रचला होता. यावेळी संशयित जमाल बिल्डर व सलमान (पूर्ण नाव माहित नाही) या पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तितक्यात त्याने कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून पोलिसांवर रोखून धरला. पिस्तुल रोखल्याने काही कळण्याच्या आत जमालने पोलिसांवर पिस्तुल ठेवत हवेत दोन राऊंड फायर केले. पोलिसांनी जीवाचे रान करुन पकडून ठेवलेला संशयित या झटापट्टीत फरार झाला. रात्रीच्या अंधराचा गैरफायदा घेत गुन्हेगार फरार झाल्याने पोलिसांना खाली हात परतावे लागले. मालेगावात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून आतातर गुन्हेगारांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी लता दोधे यांनी देखील घटनास्थळी जावून पाहणी केली आहे.


ताज्या बातम्या