Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात बर्निंग कारचा थरार; मालेगावी सहारा हॉस्पिटल जवळ आगीत व्हॅन खाक..

दि . 09/03/2022

सुदैवाने जीवित हानी टळली

मालेगाव शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता असलेल्या नवीन बसस्थानक परिसरात अचानक कारने (व्हॅन) पेट घेतला. कारने पेट घेतल्यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळ निर्माण झाला. अत्यंत वर्दळीचा हा परिसर असून सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नसली तरी कार मात्र जळून खाक झाली आहे. सहारा हॉस्पीटलच्या खालीच ही घटना घडली. वेळीच प्रसंगवधान राखले गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

 

कार क्र. (एम.एच. १५ सी.टी. ९८५०) हि सहारा हॉस्पीटल जवळ उभी असतांना कारने अचानक पेट घेतला. ऐनवेळी कारमध्ये कोणी नव्हते. मात्र दुचाकी पार्किंगजवळच कार पेटल्याने कारच्या अवती-भोवती अनेक पेट्रोल दुचाकी उभ्या होत्या. त्यामुळे नागरिकांची पळापळ झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी जावून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान कार कोणाच्या मालकीची होती. कार इथे का उभी होती, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र मालेगावकरांनी द बर्निंग कारचा थरार अनुभवला.

 


ताज्या बातम्या