Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
चाळीसगाव व नांदगावला पकडला कोटींचा गुटखा..

दि . 08/03/2022

राजस्थान जयपूर कडून मालेगाव मार्गे   कंटेनर मधून  मुंबईकडे जाणारा 93 लाख 23 हजार  रुपये किमतीचा गुटखा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रात्री 12 वाजता गस्तीवर असलेल्या युवराज नाईक ,गोवर्धन बोरसे, नितीन आमोदकर , भुपेंद्र वंजारी ,प्रेमसिंग राठोड अशा कर्मचारी वर्गाला बेलगंगा साखर कारखान्याजवळ हा कंटेनर दिसला त्यांनी चालकाला विचारणा केली असता; त्याने उडवाउडवी उत्तरे दिली. झाडा झडती घेतली असता त्यात 
ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुटख्याचा ट्रक पकडला. यावेळी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जवळपास 92 लाख 34 हजाराचा गुटखा रुपयांचा गुटखा (सुगंधी सुपारी) असल्याचे उघड झाले. गुटखा आणि कंटेनर जप्त करण्यात आला असून याप्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच नांदगांव  तालुक्यातील
 बोलठाण येथील प्रिन्स ट्रेडर्सवर छापा टाकला असता; ४६ लाखांचा गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला.अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक व नांदगाव पोलीस यांनी संयुक्तिक कारवाई करत  नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील प्रिन्स ट्रेडर्स या गोदामावर छापा टाकत ४६ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला. मध्यरात्री केलेल्या या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोडावून व एका वाहनातुन सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला आदींच्या भरलेल्या गोण्या जप्त करण्यात आला..या कारवाईवेळी संशयित गोकुळ कोठारी व श्री.जैन यांनी तपासात अडथळा करण्याचा प्रयत्न केला.या दोघा संशयितांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दरम्यान, या घटनेतील दोघेही संशयित फरार झाले आहेत..


ताज्या बातम्या