Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नामपूर रोड बनला मृत्यूचा सापळा; दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण जागीच ठार

दि . 08/03/2022

मालेगाव (जय योगेश पगारे) आज दि. 8 रोजी मालेगाव नामपुर रस्त्यावर सकाळी आठ वाजेच्या दरम्यान निळगव्हाण फाटा येथे व साडेबाराच्या दरम्यान चर्च जवळील नवीन कॅम्प पोलिस स्टेशनच्या समोर झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहे

पहिला अपघात सकाळी आठच्या सुमारास निळगव्हाण फाट्याजवळील

 हॉटेल बिरोबा जवळ झाला या मोटारसायकल व ट्रकच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत, अपघातात मोटारसायकल ट्रक च्या खाली जवळपास 400 मीटर फरफटत गेली. नामपूर कडून मालेगाव कडे म्हशी वाहतूक करणाऱ्या ट्रक क्र x6686 अर्धवट नं प्लेट असलेल्या थकणे मोटारसायकल स्वारास धडक दिल्याने

मयत बाप लेक बप्पू शिवा मानोर (55) पप्पू बप्पू मानोर (25) हे दोघे जण जागीच ठार झाले असून ट्रक चालक अपघात स्थळापासून ट्रक सोडून पसार झाला.

पुढील तपास वडनेर खाकुर्डी पोलीस करीत आहे

 

दुसऱ्या घटनेत चर्च जवळील नवीन कॅम्प पोलीस स्टेशनच्या समोर दुचाकीस्वारांना भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने रस्त्यावर कडून दोघे ट्रकच्या मागे चाकात डोके गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे

 

उमेश मधुकर नेरकर (47) रा. पीडब्ल्यूडी ऑफिस च्या मागे मालेगाव कॅम्प व दिलीप रघुनाथ येवले (55) रा. राजमाने

हे दुचाकीस्वार अपघातात जागीच मरण पावले आहेत सदर घटना सीसीटीवी मध्ये कैद झाले असून कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत.


ताज्या बातम्या