Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कृषीमंत्रीच्या वाढदिवसानिमत्त मालेगावकरांना सव्वाशे कोटींचे गिफ्ट नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेची घोेषणा; भुसेंचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात..

दि . 07/03/2022

मालेगाव शहरातील गटारी, रस्ते, पाणीपुरवठा यांच्या कामांसाठी तब्बल सव्वाशे कोटींचा निधी मंजूर करुन दिल्याची घोेषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिदे यांनी येथे केली. यासाठी निमित्त होते कृषीमंत्री दादा भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याचे. नगरविकासमंत्री शिंदे या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना त्यांनी ही घोेषणा केली. यामुळे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगावकरांना तब्बल १२५ कोटींच्या विकास कामांचे भरगच्च गिफ्ट मिळाले आहे.
येथील यशश्री कंपाउंड येथे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या वाढदिवसानिमत्त शिवसेना व युवासेना तर्फे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह आ. सुहास कांदे, आ. नरेंद्र दराडे, आ. मंजुळा गावीत, जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, भाऊसाहेब वाजे, माजी जिल्हाप्रमुख अलताफ खान, उपजिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आ. अनिल कदम, अजय बोरस्ते, उदय सांगळे, हिलाल माळी, जिल्हासंघटक ॲड. संजय दुसाने, उपमहापौर निलेश आहेर, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, कृउबा सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
------------------------------------------------

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषीमंत्री भुसे यांनी नगरविकासमंत्री शिंदे यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मालेगावचा सर्वांगिण विकासाबाबत माहिती देतांना भुसे यांनी सांगितले की, येत्या वर्षभरात मालेगावच्या एमआयडीसीत तब्बल १०० हून अधिक प्रकल्प सुरु होतील, तसेच येत्या काही काळात लवकरच मंजूर झालेल्या कृषी महाविद्यालयांच्या भूमिपुजनाचे देखील नियोजन असून त्यांसाठी नगरविकासमंत्री शिंदे यांना पुन्हा लवकरच मालेगावी यावे लागणार असल्याने त्यांनी या कार्यक्रमातच शिंदे यांना आमंत्रण दिले.
------------

धर्मवीर आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा देत नगरविकासमंत्री शिंदे म्हणाले की, मालेगावकरांचे विशेष प्रेम धर्मवीर दिघे यांच्यावर होते. धर्मवीर दिघे हे देखील मालेगावच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलेत. मालेगावातून येणाऱ्या जनसमुदायाला त्यांनी नेहमी आपुलकीची वागणूक दिल्याचा उल्लेख करीत भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर आनंद दिघेंच्या आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला.


ताज्या बातम्या