Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सरफेस टेन्शन मुळे पाणी घेतले जाते,नंदीला बदनाम करु नका -महाराष्ट्र अंनिसचे भाविकांना आवाहन .

दि . 05/03/2022

 

नाशिक ( प्रशांत गिरासे) पूर्ण भारतभर आज नंदी, महादेवाची मूर्ती ,कासव हे पाणी पितानाचा चमत्कार सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे .आणि मंदिरात भाविक रांग लावत पाणी पाजण्याचा चमत्काराचा अनुभव घेताना आढळून येत आहेत .कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. 

 

आज सर्व भारतभर नंदी दूध वा पाणी पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत आणि २१सप्टेंबर, १९९५ च्या घटनेची पुनरावृत्ती झाली. सर्वप्रथम असा कोणताही चमत्कार घडत नाही हे लक्षात घ्यावे व अशा घटनेमागील कार्यकारण भाव समजून घ्यावा. या चमत्कारामागील विज्ञान समजून घ्यायला हवे विज्ञानामध्ये याला पृष्ठीय ताण किंवा सरफेस टेंशन म्हणतात. या ताणामुळे दगडाच्या मूर्तीत पाणी खेचले जाते. मूर्ती आतून पोकळ असल्यास पाणी तोंडाच्या पोकळीतून पोटात जाते व मूर्ती भरीम असल्यास खाली जमिनीवर झिरपते.

 थोडी चिकित्सक वृत्ती आणि शोधक बुध्दी वापरली तर हे सहज लक्षात येते. त्यामुळे अशा चमत्कार आणि अफवांना कोणीही बळी पडू नये व विनाकारण गर्दी करु नये. असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे

 

 नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्टीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळे. समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणू चा असलेला पृष्टीय थर हा दुसरा त्याच गुणधर्माचा थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो .मूर्ती स्वतः पाणी खेचते असते ती एका थेंबाच्या रूपात असते आणि नवीन पाण्याचा चमचा ज्या वेळेस त्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो त्यावेळेस ते पाणी खेचले जाते. याला विज्ञानाच्या भाषेत सरफेस टेन्शन किंवा पृष्टीय ताण असे म्हटले जाते .यामागे कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 

 विनायक सावळे ,

राज्य सरचिटणीस ,

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.


ताज्या बातम्या