Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पोलिसांनी शोधल्या चोरीला गेलेल्या शेळ्या सात शेळ्या; आठ बोकड जप्त,विशेष पथकाची कारवाई..

दि . 03/03/2022

मालेगाव शहरातील आजमपुरा भागात राहणाऱ्या एका गोट फार्म व्यावसायिकाचे फार्ममधून २२ जानेवारी रोजी चोरीला गेल्या शेळ्या-बोकड यांना शोधून काढण्यात विशेष पोलीस पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सात शेळ्या आणि आठ बोकड नुकतेच जप्त केले असून अन्यही काही शेळ्या-बोकड यांचा पोलीस शोध घेत आहेत.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, शहेबाज अन्वर सिराज अहमद (वय ३०, रा. आजमपुरा) हे गोट फार्मचा व्यवसाय करतात. शहरातल कल्लु स्टेडियमच्या बाजुला त्यांचा गोट फार्म आहे. याठिकाणी एकूण ५४ शेळ्या-बोकड होते. मात्र या ठिकाणाहून २२ जानेवारी रोजी फार्ममधून १४ शेळ्या, ७ बोकड, ६ पिल्ले असे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी शहेबाज अन्वर यांनी पवारवाडी पोलीस ठाण्यात शेळ्या-बोकड चोरीला गेल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. 
शहरातील विशेष पोलीस पथकाने चाळीसगाव फाटा परिसरातील एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये केलेल्या कारवाईत चोरीला गेलेल्या ७ शेळ्या, ८ बोकड जप्त केले असून अन्य पिल्लांचा शोध सुरु असून या कारवाईत चोरटा मात्र फरार झाला आहे. या चोरट्यांचा शोध पवाराडी पोलीस घेत आहेत.यात PSI घुगे, वसंत महाले, राकेश उबाळे,भूषण खैरनार, संदीप राठोड यांनी काम पाहिले.


ताज्या बातम्या