Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पुन्हा त्याच ठिकाणी झालेल्या बायोडिझेल कारवाईचे गूढ वाढले; अद्यापही गुन्हा दाखल नाही..

दि . 03/01/2022

 मालेगाव: तीन महिन्यापूर्वी याच ठिकाणी IG यांच्या टिम ने आणि आता SP यांच्या टिमने कारवाई केली. जनतेमध्ये प्रश्न निर्माण होतोय कि शहरात इतर ठिकाणी अश्या प्रकारचे व्यवसाय सुरु नाहीत का? पुन्हा त्याच अड्ड्यावर दोनदा छापे टाकण्यामागे राजकीय दबाव किवां आर्थिक वाटाघासाठी तर केले जात नाही ना? पुन्हा एजाज बेग का? साठवणीचा परवाना असून मागील कारवाईत बायोडिझेल आढळून न आल्याने त्याच कारवाईचा मुद्देमाल वापस करण्याची नामुष्की ओढावल्यापासून महसूल विभागाने यावर पत्र पाठऊन कारवाई मागची बाजू स्पष्ट केली त्यावरून पोलीस प्रसासन काय धडा घेते  याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मालेगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने पथकाने शुक्रवारी रात्री स्टार हॉटेलच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकत छाप्यात काही हजार लिटर बायोडिझेल सदृश्य द्रवासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. हा त्याच ठिकाणी पुन्हा मारण्यात आला कि ज्या कारवाईचा ४३ लाखांचा मुद्देमाल परत करण्याची नामुष्की ओढवली होती. आणि आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच ठिकाणी कारवाई केल्याने तहसीलदार यांनी पुन्हा अशी नामुष्की ओढावू नये म्हणून जप्त द्रवाची तपासणी करून मगच गुन्हा दाखल करण्यचा सल्ला पत्र लिहून पोलिसांना सल्ला दिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या मालेगाव युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा अधिकारी अशोक सावणे यांच्या उपस्थितीत एका पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेल सदृश्य द्रवाचा साठा आढळून आला होता. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

 


ताज्या बातम्या