Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
12.50 कोटी रुपयांच्या विकास कामांचे ना.दादाजी भुसे यांचे हस्ते भुमीपुजन संपन्न ; प्रभागातील सेनेचे नगरसेवकच गैरहजर असल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न ?...

दि . 02/01/2022

मालेगांव- मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणेसाठी ना.दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्याने नववर्षाच्या स्वागताला मालेगाव शहरातील 12.50 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असुन त्या कामांचे भुमीपुजन दि.01 जानेवारी 2022 रोजी कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांचे हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक दहा मधील उपमहापौर निलेश आहेर सोडले तर अन्य नगरसेवक गैरहजर होते. ज्या प्रभागात ही विकास कामे होत आहेत त्याच प्रभागातील नगरसेवक अनुपस्थित असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मालेगाव शहरातील प्रमुख रस्ता असलेला सोयगांव - टेहरे चौफुली ते डि.के.कॉर्नर रस्ता काँक्रीटीकरणासाठी 8 कोटी रुपये, डि.के.कॉर्नर ते गवती बंगाला, चर्च रस्ता काँक्रीटीकरण करणे 3.30 कोटी, डि.के.कॉर्नर ते सुर्यवंशी लॉन्स, सबस्टेशन रोड रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी 50 लक्ष अशा तीन रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी सुमारे 12 कोटी रुपये मंजुर करण्यात आले. मालेगाव शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन केले असुन त्याचा पाठपुरावा सुरु असल्याने ना.दादाजी भुसे यांनी सांगितले.
यावेळी सोयगाव येथील माऊली चौक शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटनही ना.दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले.
          त्याचप्रमाणे मालेगाव शहरातील लहानमुले, महिला व ज्येष्ठ नागरीकांसाठी असलेल्या मा.बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुल येथे जॉगींग ट्रॅक करणे, विद्युत खांब, साऊंड सिस्टीम, लाईट, चौकीदार रुम व इतर अनुषंगिक कामांसाठी 63.37 लक्ष रुपये व डि.के.उद्यान-सोयगांव येथे चौकीदार रुम बांधणेसाठी 10 लक्ष असे 73.37 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले असल्याचे ना.दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमांप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख रामभाऊ मिस्तरी, उपमहापौर निलेश आहेर, ज्येष्ठ मनोहरबापु बच्छाव, आर.के.बच्छाव, विनोद वाघ,  डॉ.शरद बच्छाव, अनिल पवार, प्रमोद पाटील, नंदुआण्णा बच्छाव, प्रकाश आहिरे, निलेश काकडे, अभिजीत पगार, मधु देवरे, योगेश पाटील, सुनिल सोनवणे, अशोकआण्णा पाटील, अर्जुन पवार, राजु सुर्यवंशी, किरण बच्छाव व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

 

"प्रभागातील नगरसेवकच गैरहजर..."


कृषीमंत्री दादा भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून शहरात विविध विकास कामे सध्या सुरू आहेत. प्रभाग क्रमांक १० सह इतरत्र तब्बल साडेबारा कोटी रुपयांचे विकास कामाचा शुभारंभ नव वर्षच्या प्रारंभी करण्यात आला. मात्र या उद्घाटन कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक दहा मधील उपमहापौर निलेश आहेर सोडले तर अन्य नगरसेवक गैरहजर होते. ज्या प्रभागात ही विकास कामे होत आहेत त्याच प्रभागातील नगरसेवक अनुपस्थित असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामागे शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजी तर नसेल ना?  असा प्रश्न उद्धाटन कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही.


ताज्या बातम्या