Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळ्याच्या बनावट "प्रमाणपत्राचे मालेगांव कनेक्शन", लशींची काळाबाजारात विक्री ?...

दि . 30/12/2021

धुळ्यात दिले जाते बनावट लसीकरण प्रमाणपत्र...

मालेगांव मनपाने केला प्रकार उघड...

मालेगावच्या नागरीकांचे बनावट लसीकरण प्रमाणपत्र बनते धुळ्यात...

लसीकरनाचा गोरखधंदा...

मालेगांव मनपाकडून चौकशीची मागणी...

एकाच बॅचनंबर असलेल्या डोसच्या बाटलीमधून दोन्हीही डोस घेतल्याचे प्रमाणपत्रे आढळल्याने आरोग्य विभागात चाललंय तरी काय असा प्रश्न? 

९० दिवसांनंतर एक सारखाच बॅच क्रमांक कसा येवू शकतो..?


मालेगावच्या नागरीकांची धुळ्यात लसीकरणासाठी धाव , बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याचे उघड; मालेगाव मनपाने दिले धुळे मनपाला चौकशीचे पत्र...

धुळे महापालिका व शासनाची फसवणूक होणार नाही याची खात्री करुन बनावट प्रमाणपत्र बनविणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करुन मालेगाव महापालिकेला या कारवाईबाबत अवगत करावे असे पत्र...
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर बोगस लसीकरण प्रमाणपत्र वितरित केले गेले. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात ‘मालेगाव कनेक्शन’ही समोर आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. त्याची चौकशी चौकशीत उघड.धुळ्यात महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना बोगस लसीकरण प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

दरम्यान,  बोगस लसीकरण प्रमाणपत्रे वितरित झाली, त्यात वापरात न आलेल्या लशींच्या काळ्या बाजारात विक्रीच्या संशयामुळे दोन कोटींपर्यंत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.आता या बोगस लसीकरण प्रमाणपत्रांच्या विषयात ‘मालेगाव कनेक्शन’ समोर आल्याने विषय गंभीर बनला आहे.  धुळे महापालिकेच्या माध्यमातून चालणाऱ्या लसीकरण केंद्रांवरून ज्या लाभार्थ्यांना लस दिल्याचे दाखविले गेले, त्यातील अनेक जणांना लस न देताच केवळ ऑनलाइन प्रमाणपत्र वितरित झाल्याचा आरोप आहे. यात मालेगाव शहरातील नागरिकांनाही असे प्रमाणपत्र वितरित झाल्याचा आरोप आहे. ८४ दिवसांनंतर लशीचा बॅच नंबर बदलतो, मात्र संबंधित नागरिकांना दिलेल्या प्रमाणपत्रांवर दोन्ही डोसचे बॅच नंबर सारखेच आढळून आले आहेत. त्यामुळे बोगस लसीकरण प्रमाणपत्र वितरित झाल्याचा संशय बळावला आहे. याबाबत मालेगाव महापालिका प्रशासनाकडून धुळे महापालिका प्रशासनाशीही चौकशीबाबत पत्रव्यवहार झाला आहे.


ताज्या बातम्या