Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून केले ठार; पतीवर खुनाचा गुन्हा दाखल...

दि . 08/08/2021

देवळा : मानसिक संतुलन बिघडल्याने पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून ठार केल्याची घटना उमराणे ता देवळा येथे  सकाळी साडेसहा वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली असून,या घटनेबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उमराणे ता देवळा येथील मानसिक संतुलन बिघडल्याने पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून ठार केल्यानंतर स्वतःच्याही डोक्यात फावडे मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना  सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे.या घटनेने उमराणेसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मंगलाबाई शांताराम देवरे असे या मृत महिलेचे नाव आहे.पती शांताराम देवरे यालाही जखमी अवस्थेत धुळे येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आल्याचे समजत आहे.या महिलेच्या हत्येप्रकरणी मुलगा दिपक शांताराम देवरे याने देवळा पोलिसात फिर्याद दिली असून देवळा पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.