Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वाखारी जिल्हा परिषद गटात निधी वाटपात अन्याय करू नका ; पालकमंत्री भुजबळ 

दि . 08/08/2021

देवळा : वाखारी जिल्हा परिषद गटात निधी  जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्या व सत्ताधारी सदस्यावर निधी वाटपात अन्याय होऊ देऊ नका  अशा शब्दात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बांधकाम सभापती डॉ सयाजीराव गायकवाड यांना सांगितल्याची माहिती जि प सदस्या नूतन आहेर यांनी दिली. जिल्हा परिषद वार्षिक योजनेच्या निधी वाटपाचे नियोजन अनेक दिवसांपासून रखडले असून त्यात विरोधी व सत्ताधारी सदस्यांमध्ये निधी वाटपावरून वाद सुरू होता, सदस्यांना विकास कामे करण्यासाठी कमी कालावधी उरला असल्याने गटातील जास्तीत जास्त विकास कामांवर भर देण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत वाखारी गटाच्या सदस्या नूतन आहेर यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती डॉ. सयाजीराव गायकवाड यांची भेट घेऊन विरोधी पक्षाच्या सदस्यांना अधिक निधी का दिला जातो असा जाब विचारत माझ्या गटात अनेक विकास कामे खोळंबली असून त्यासाठी माझ्या गटास अधिक निधी मिळावा अशी मागणी केली असता सदर मुद्द्यावरून त्यांच्यात वाद उपस्थित झाला होता . त्यावरून संतप्त झालेल्या नूतन आहेर यांनी रविवारी (दि ८) रोजी पालक मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन तक्रार केली.व निवेदन सादर केले.यावेळी नामदार भुजबळ यांनी भ्रमणध्वनीद्वारे सभापती डॉ गायकवाड यांच्याशी संपर्क साधून सौ .आहेर यांच्यावर निधी वाटपात अन्याय करू नका तसेच  निधी वाटपाचे  योग्य नियोजन करण्याचे सांगितले .  यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, देवळा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुनील आहेर, जि प सदस्य यशवंत शिरसाट, यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य उपस्थित होते.