Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हावे: नितीन देशमुख..

दि . 08/08/2021

गझल मंथन  साहित्य  संस्थेचा ऐतिहासिक  महागझलोत्सव यशस्वी 

मालेगाव- सुप्रसिद्ध गझल चळवळ  असलेल्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या अधिकृत यु-ट्यूब चॅनेलचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून, गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने आजवरचा सर्वात दीर्घकाळ चालणारा आणि राज्यातील सर्वात जास्त गझलकार सहभागी झालेल्या  गझलामृत महागझलोत्सवाचे आयोजन गुरुवार ५ आणि शुक्रवार ६ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या गझलामृत महागझलोत्सवात ६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजे पर्यंत महाराष्ट्रातील जवळपास ३०० नामवंत मराठी गझलकार सहभागी झाले होते. 
      गझलामृत महागझलोत्सवाचे अध्यक्ष स्थानी सुप्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख अमरावती तर स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार आ. भूषण कटककर (बेफिकीर) पुणे होते. या कार्यक्रमाला उर्मिलामाई बांदिवडेकर, डॉ. शिवाजी काळे सर, डॉ.कैलास गायकवाड सर , प्रमोद खराडे, निलेश कवडे , संजय गोरडे सर, शरयूताई शहा,  समीर बापट, सुनंदामाई पाटील, डॉ राज रणधीर, डॉ. स्नेहल ताई कुलकर्णी, हेमलताताई पाटील हे मान्यवर प्रमुख पाहुणे तर सन्माननिय उपस्थिती मध्ये प्रसादस कुलकर्णी, मसूद पटेल,  डॉ. संतोष कुलकर्णी, कालिदास चवडेकर सर, जयदीप विघ्ने,  शाम खामकर, सुप्रिया ताई जाधव,  अभिजीत काळे सर, विशाल राजगुरु, गोपाल मापारी सर, आत्माराम जाधव, आत्तम गेंदे, रघुनाथ पाटील, प्रशांत पोरे, शेखर गिरी, दिनेश भोसले, संदीप जाधव सर, राज शेळके, नंदकिशोर आगळे , डॉ. अमिता ताई गोसावी, सुनंदाताई शेळके, रुपेश देशमुख, नारायण सुरंदसे, श्रीराम पचिंद्रे, एजाज शेख, अनिल आठलेकर, संतोष शेळके आणि अमोल शिरसाट यांचा समावेश होता. अध्यक्षीय भाषणात बोलतांना नितीन देशमुख यांनी कवींनी सकारात्मक राहून लिहले पाहिजे असे विचार प्रकट केले. या महा आयोजनाचे मुख्य सूत्रसंचालन सुप्रसिद्ध गझलकार रत्नाकर जोशी यांनी तर विविध सत्रात होणाऱ्या गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन काशीनाथ गवळी, चंद्रशेखर महाजन, डॉ रेखा देशमुख,  दिगंबर खडसे,  दिपाली मेहेत्रे, नंदिनी काळे, नरेशकुमार बोरीकर, नेतराम इंगळकर, पौर्णिमा पवार, प्रणाली म्हात्रे, मानसी जोशी, यशवंत म्हस्के,  विष्णु जोंधळे, सुनिल बावणे, सुनेत्रा जोशी यांनी केले. मुख्य सोहळ्याचे सूत्रसंचालन विष्णु जोंधळे यांनी केले महामहोत्सवाला वसुदेव गुमटकर ( देवकुमार ),  उमा पाटील, संजय तिडके , अलकनंदा परिहार आणि उज्वला इंगळे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. गझलमंथन समूह एक, गझलमंथन समूह दोन, अभ्यास समूह, जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष आणि सदस्य, गझलमंथन कार्यशाळेतील सदस्य तसेच  महाराष्ट्रातले नामवंत गझलकार यांचा दोन दिवसीय गझल अमृत महागझल महोत्सवामध्ये सहभाग होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष अनिल कांबळे उपाध्यक्ष देवकुमार सचिव जयवंत वानखडे सहसचिव उमा पाटील यांच्यासह गझल मंथन परिवारातील अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती गझलकार काशिनाथ गवळी अध्यक्ष नाशिक जिल्हा कार्यकारणी यांनी दिली.