Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अवघे मनमाड हळहळले... विहिरीतून पाणी काढताना सासू-सुनेचा बुडून अंत ....

दि . 29/07/2021

मनमाड :  विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन सासू विहिरीत पडल्याचे पाहून तिला वाचविण्यासाठी गेलेल्या सुनेचाही सासू सोबत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. संबंधित घटना ही मनमाडच्या पांडुरंग नगर भागात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गयाबाई अशोक पवार  (50) असं मृत सासुचं नाव आहे. तर मनीषा सचिन पवार ( 20) असे सूनेचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

अशी घडली दुर्घटना  

गयाबाई आणि मनीषा या दोघी सासू-सून पाणी आणण्यासाठी शेजारच्या मळ्यात असलेल्या विहिरीवर गेल्या होत्या. या विहिरीला काठडा नाही. त्यामुळे पाणी काढत असताना 50 वर्षीय गयाबाई यांचा विहिरीत तोल गेला. यावेळी तिथे मनीषा व्यतीरिक्त कुणीही तिथे नव्हता. आपली सासू विहिरीत पडल्यानंतर मनीषाने प्रचंड आरडाओरड केली. पण आजूबाजूला कुणीही नव्हतं. त्यामुळे कुणीही मदतीसाठी पोहोचू शकलं नाही.

अखेर मनीषाने सासूला वाचवण्यासाठी साडीचा पदर विहिरीत टाकला. तिने सासूला तो पदर पकडण्यास सांगितलं. पण यावेळी तिचाही विहिरीत तोल गेला. यावेली आजूबाजूला कुणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. दोघी सासू-सूनेला पोहता येत नसल्याने त्यांचा विहिरीत बुडून मृ्त्यू झाला.