Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा शहरासह तालुक्यात ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ..

दि . 01/04/2021


राकेश आहेर (देवळा): देवळा तालुक्यात काही दिवसांतच झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांनमुळे संपूर्ण देवळा तालुक्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
   देवळा शहरासह मेशि, दहिवड, उमराणे हे गावे जास्त करून कोरोनाचे हॉट स्पॉट बनली आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या आत्तापर्यंत २७४२ झाली असुन बरे झालेल्यांची संख्या १८४४ आहे. तसेच उपचाराखालिल रुग्णांची संख्या ८६७ आहे, तर ८०४ रुग्ण हे गृहविलगिकरणात असुन मागिल वर्षांपासून आजपर्यंत ३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष मांडगे यांनी दिली आहे.
  शहरि भागापेक्षा आता ग्रामीण भागात रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.त्यास कारणही तसेच आहे. कोरोनामुळे आम्हाला काहिच होत नाही हा फाजिल आत्मविश्वास लोक बाळगत आहेत, तसेच पॉझिटिव्ह रुग्णांना गृह विलगिकरणात ठेवल्याने ते घरि न बसता ईतरत्र फिरत आहेत. रुग्णांचे नाव गुपित ठेवले जाते तसेच रुग्ण पॉझिटिव्ह आहे असा शिक्का त्यांच्या हातावर मारला जात नसल्याने ईतर लोकांना समजत नाही की, हा रुग्ण पॉझिटिव्ह आहे त्यामुळे लोक अशा लोकांच्या संपर्कात येत आहेत त्यामुळे रुग्ण संख्या ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे.

संपूर्ण तालुक्यात दहा दिवसांचा बंद

  देवळा तालुक्यात रुगणसंख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता आजपासुन दहा दिवसांचा स्वयंघोषित बंद पाळण्यात येणार असल्याचा निर्णय मंगळवारी देवळा येथे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

मेशी येथे ग्रामपंचायतीच्या तसेच आरोग्य विभागाच्या  निष्काळजीपणामुळेही रुग्ण संख्येत वाढ

मेशी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाबाबत अत्तापर्यंत तीन दिवसांचा बंद वगळता कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. मेशी येथे एका महिन्यात रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला आहे. पण गावात कुठेही साफसफाई करण्यात आलेली नाही. तसेच गावात जंतुनाशक फवारण्या करण्यात आलेल्या नाही. त्याचप्रमाणे गावाच्या मुख्यठिकाणी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटजवळ  सॕनिटायझर्स यंत्र लावण्यात आले पाहिजे होते, पण मेशी ग्रामपंचायतीने याकडेही कानाडोळा केला आहे. ग्रामपंचायतीतील काही सदस्य अपवाद वगळता ईतर सदस्यं गावासाठी वेळ देत नसल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सर्रासपणे गावभर फिरत आहेत. तसेच जे रुग्ण एक वेळेस पॉझिटिव्ह आल्यावर काही दिवसांनी निगेटिव्ह झाले की नाही ही टेस्ट परत करण्यासाठी रुग्ण येत आहेत की नाही याचा तपास ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभाग करत नाही. तसेच गावबंदचा निर्णय सर्वांना सम प्रमाणात ग्रामपंचायत लागु करत नाही, फक्त छोट्या व्यवसायिकांनवर दबाव आणुन मोठे व्यावसायिक मात्र बंदचा फायदा उठवुन मागच्या दाराने किंमत जास्त आकारून वस्तू विक्री करतात,अशी सर्वसामान्यांनमध्ये चर्चा सुरू आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात ही साफसफाईकडे दुर्लक्ष

मेशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहिजे तशी साफसफाई नसल्याने आरोग्य केंद्रात ज्या टेस्टिंग हॉलजवळ  कोरोनाची टेस्ट करतात त्या खिडकीजवळ चक्क देशी दारुच्या तीन ते चार खाली बॉटल पडलेल्या आहेत. त्या नेमक्या बाहेरिल व्यक्तिच्या आहेत की आरोग्य केंद्रातिल कर्मचारिच त्यांचे सेवन करतात याचाही खुलासा करणे गरजेचे आहे.