Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बहिराणे शिवारात बिबट्या जेरबंद

दि . 22/03/2021

सटाणा : बहिराणे (ता.बागलाण) येथील शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने हैदोस घातला होता. शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गायीचे वासरू, शेळ्या - मेंढ्या तसेच कुत्र्यांचा फडशा पाडला होता. याबाबत स्थानिक नागरिकांकडून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ताहाराबाद वनविभागाकडे जोर धरत होती. याचीच दखल घेऊन वनपाल बोरसे यांनी व सहकारी रेणुका आहिरे, राजेंद्र साळुंखे, के.एम.आहिरे, दिलीप खेमनार, जगन आहिरे, अक्षय हेंबाडे, जिभाऊ आहिरे, रवींद्र सोनवणे यांनी अंबासन येथील ढेक-या डोंगरालगत लावलेला पिंजरा ताब्यात घेऊन बहीराणे शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावला होता. गेली दोन दिवस बिबट्याने हुलकावणी दिली होती दरम्यान गुरूवार (ता.१९) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे वन कर्मचाऱ्यांना समजताच घटनास्थळी दाखल होऊन एका पिकअप वाहनात नागरीकांच्या मदतीने ताहाराबाद येथील वनपरिक्षेत्रात नेण्यात आला. परिसरात बिबट्या जेरबंद झाल्याची वार्ता समजताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.