Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा महाविद्यालयात चिमण्यांसाठी पाण्याची सोय

दि . 22/03/2021

देवळा ; आंतरराष्ट्रीय जलादिनानिमित्त येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये चिमण्यांसाठी दाने व पाणी आणि निवारा अशी व्यवस्था करण्यात आली.  पिंपळगाव बसवन्त येथील उद्योगपती  हरेश शहा यांनी "अमी जिवदया " या संस्थेमार्फत जिल्ह्यातील ७५ शाळांना मोफत बर्ड फिडर,बर्ड होम व बर्ड फिडर असे साहित्य भेट दिले .ते मिळालेले संच देवळा महाविद्यालयाच्या प्रांगणात बसविण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. ई.आहेर ,पर्यवेक्षक ए.के.आहेर,वृक्षमित्र सुनील आहेर यांच्या हस्ते सदर किट बसवण्यात आले.त्याकामी डी. वाय भदाने,एस.टी.पाटील ,किशोर पगार,नंदलाल पवार यांनी परिश्रम घेतले . याप्रसंगी सुनीता निकम,वैशाली काळे,शुभदा आहेर आदी उपस्थित होते. सुनील आहेर यांच्या प्रयत्नातून देवळा एज्युकेशन सोसायटीच्या इतर शाखांना सुद्धा सदर किट उपलब्ध करून देण्यात आले असून त्या त्या शाळेत लवकरच किट बसवण्यात येणार आहेत.