Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नांदगांव : कोविड लसीकरण केंद्र सुरू व्हावे ; संतोष गुप्ता यांचे उपोषण.

दि . 16/03/2021

नांदगांव ( प्रतिनिधी ) : नांदगांव शहरात कोविड लसीकरण केंद्र सुरू व्हावे, जेष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांनी आज  नांदगांवच्या जुन्या तहसील कार्यलयासमोर उपोषण केले.दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाशी विचार विनिमय करून पुढील तीन दिवसात त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ससाणे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिसवळ, वेहेळगाव, पिंपरखेड, बोलठाण आदी प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कोविड - १९ लसीकरण सुरू आहेत.मात्र नांदगांव शहरातील जेष्ठ नागरिक हे अनेक व्याधींनी त्रस्त असतात त्यामुळे कोविडची लस घेण्यासाठी त्यांना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शहरातून जाणे सोयीचे नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे.जेष्ठ नागरिकांची ही अडचण दूर व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांनी सोमवारी उपोषणाचा मार्ग अवलंबवला होता.आमदार सुहास ( अण्णा ) कांदे यांनी याबाबत मध्यस्थी करत तहसीलदार उदय कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ससाणे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे यांच्याशी चर्चा करून कोविड केंद्र सुरू करणेबाबत सूचना केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, अमोल नावंदर, डॉ.सुनील तुसे, शिवाजी पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे जगन्नाथ साळुंखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे, मूलचंद मोरे, सुमित गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.