Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कळवण तालुक्यातील रस्ते खड्डेमय

दि . 04/03/2021

तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी आमदार जेपी गावित यांनी शासनाकडे केली आहे.


कळवण :   गेल्या अनेक  वर्षापासून मळगाव ते कुत्तरबारी रस्त्याची दुरावस्था झाली आहे.  वाहनधारकांना हकनाक त्रास सहन करावा लागतो. मात्र संबधित विभागाने याकडे सोयीस्कर रित्या दूर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती बाबत  विविध गावातील आदिवासी नागरिकांनी माजी आमदार जे पी गावित यांकडे तक्रार केली आहे. माजी आमदार गावित यांनी रस्त्याची पाहणी करून या रस्त्याची तात्काळ सुरुस्ती करावी अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे.तालुक्यातील मळगाव ते गायदर पाडा (मळगाव) तसेच  आसोली फाटा ते बार्डे रस्त्यावर  ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. .नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था रस्त्यांची झाली आहे. तालुक्यात रस्ते तयार करण्याचा  खर्च कोटीत तर त्याच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे खर्च लाखात केला जात आहे. कळवण आदिवासी सावर्जनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागात आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खाताय अशी अवस्था झाली आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांप्रमाणे सर्वच लोकप्रतिनिधींचाही आर्थिक कानाडोळा आहे का? असा सवाल आदीवासी बांधव चावडीवर चर्चा करतांना  करीत आहेत.  कोणत्याही रस्त्याचे नवीन काम झाल्यास त्या रस्त्याची पाच वर्ष देखभाल संबंधित ठेकेदाराने करणे बंधनकारक असते. असे असतांना एकाच पावसाळ्यात खड्डेमय झालेल्या कोणत्याच रस्त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून केली जात नसल्याचे दिसून येत आहे. 
 ग्रामीण भागातील रस्त्यावरील खड्ड्यांना प्रवाशी, विद्यर्थी जेष्ठ नागरिक महिला व पुरुषांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शासन दरवर्षी तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते तयार करतात. मात्र कामात पारदर्शकता नसल्याने सुमार दर्जाच्या रस्त्यावरून प्रवाशांना खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी माजी आमदार जे पी गावित यांनी शासनाकडे केली आहे.