Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
योगेश हिवाळे या तरुणाच्या आत्महतेला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबीत करा;देवळा तालुका वंचित बहुजन आघाडी

दि . 04/03/2021

देवळा ; योगेश हिवाळे या तरुणाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या भद्रकाली पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी या आशयाचे निवेदन  तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  देवळा  तहसील कार्यालयात देण्यात आले.  निवेदनात म्हटले आहे की,नाशिक येथील भिमनगर(गंजमाळ) येथील तरुण योगेश हिवाळे याचा दीड वर्षापूर्वी सिव्हील ड्रेसमधील एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत वाद झाला होता.त्या दिवसापासून तर आत्महत्येच्या दिवसापर्यंत  भद्रकाली पोलिस प्रशासनाने योगेश व त्यांच्या साथीदारांना आरोपी घोषित करण्यासाठी  हेतूंपुरस्कर पणे पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर ८ते१० गुन्हे दाखल केले यावरून भद्रकाली पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या जाचास कंटाळून योगेश यांनी आत्महत्या केली आहे .यास जबाबदार असणाऱ्या  पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे,पोलिस प्रशासनाच्या ह्या हेतूपुरस्कर कृत्याचा देवळा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला . निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व जिल्हा उपाध्यक्ष बाळा जाधव,भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मिक केदारे,राहुल बच्छाव,चेतन शिवदे,श्रीकांत केदारे,किरण बच्छाव आदींच्या सह्या आहेत.