Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुंगसे मार्केटला लिलाव झालेल्या २८९ क्विंटल कांद्याचा अपहार

दि . 03/03/2021

मालेगाव :  विक्री केलेला २८९ क्विंटल ३२ किलो  कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यात खाली न करता आठ लाख २८ हजारांची फसवणूक करनाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कांदा अपहाराचा प्रकार मुंगसे कांदा मार्केटमध्ये घडला.
याप्रकरणी संशयित कल्पेश अहिरे,  नागेश्वर संजय हिरे, योगेश भागचंद सावकार, संतोष निवृत्ती फसाले यांनी जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी कांदा विक्री केला.  त्यांचा कांदा व्यापारी रामराव धर्मा सूर्यवंशी यांनी  खरेदी केला होता. वाहनांमधून कांदा विक्रीस आणून राजाराम लिलाव झाल्यानंतर हा कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यात खाली न करता चौघांनी त्याचा परस्पर अपहार केला. स्वत:च्या फायद्यासाठी आठ लाख २८ हजार रुपये किमतीच्या २८९ क्विंटल कांद्याची विल्हेवाट  लावली. याबाबत व्यापारी सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि.१) तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.