Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

दि . 14/12/2020

मालेगाव : शहरालगतच्या द्याने जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या शिष्यवृती परीक्षेत प्रणव पंकज जाधव  हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला. तर अन्य सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विजयराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका निर्मला बच्छाव यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच केंद्रप्रमुख मोठाभाऊ निकम, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी नाना बागुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर भालचंद्र साळुंखे यांनी आभार मानले.