Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आवाहन

दि . 01/12/2020

मालेगाव : अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती, महाराष्ट्र यांचेतर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आरोग्य, कला, क्रीडा, करोना योध्दा,
पत्रकारीता, शेती अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील २१ व्यक्तींना किंवा संस्थेस प्रोत्साहन मिळावे म्हणून राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती, महाराष्ट्र यांचेतर्फे स्व.रजनी रमेश खरोटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ६ जानेवारी २०२१ रोजी पत्रकार दिनानिमित्त राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रस्तावासोबत वर्षभरात
केलेल्या कामाचा अहवाल, छायाचित्रे, वृत्तपत्रीय कात्रणे, व इतर काम केल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. इच्छुकांनी २५ डिसेंबर पर्यंत प्रस्ताव andhashardhavaidyaniksamiti@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावे अथवा 7887331861/8999904565 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.