Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




डॉ. शीतल आमटे आत्महत्येच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक

दि . 01/12/2020

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे–करजगी यांचा सोमवारी मृत्यू झाला. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतले असल्याची माहिती समोर आली. त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. शितल यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. 
महाराष्ट्र पोलिसांनी शीतल आमटे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. चंद्रपूरच्या आनंदवन ग्रामपंचायत विभागात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी नागपूरहून विशेष तपास पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. सध्या तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती देणं शक्य असल्याची माहिती चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली.