Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
फ्री फायरगेमच्या वेडापायी तरुण शेतकऱ्याच्या डोक्यात घातला दगड!

दि . 01/12/2020

सुनीलला फ्री-फायर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते आणि नेमका त्याचा मोबाइल हरवला होता. त्यामुळे तो सैरभैर झाला होता.
व्यसन अनेक प्रकारचे असतात काहीना दारूचा..काहीना अंमली पदार्थाचा, तर काही जणांना मोबाईलमध्ये गेम खेळण्याचे असते. गेम खेळण्याच्या नादापायी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या तर काहीनी मोबाइलसाठी घरात चोरी देखील केली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये ऑनलाइन फ्री फायरगेम खेळण्यासाठी मोबाईल हरवला म्हणून गावात एका निरपराध तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी भौरी येथील जिभाऊ गायकवाड या तरुण शेतकऱ्याच्या खून झाला होता. त्याचा तपास करतांना पोलिसांनी याच गावातील एका तरुणाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या तरुणाची चौकसी केली असता आपणच मोबाईलसाठी जिभाऊच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची, त्याने कबुली जबाब दिला आहे. सुनील मोरे असं या आरोपीचे नाव असून त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अवघ्या ४८ तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून गजाआड केल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
सुनीलला फ्री-फायर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते आणि नेमका त्याचा मोबाइल हरवला होता. त्यामुळे तो सैरभैर झाला होता. जिभाऊ हा त्याला जाताना दिसला आणि अंधाराचा फायदा घेत त्याच्या डोक्यावर दगडाने ठार केल्यानंतर त्याच्या खिशातील पैसे काढले आणि त्यातून नवीन मोबाइल घेवून पुन्हा गेम खेळण्यात गुंतला होता. मात्र, त्याचा हा गेम अंतिम ठरला आणि त्याला तुरुंगात जाण्याची वेळ आली.