Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




कर्जास कंटाळून तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दि . 04/11/2020

बागलाण : तालुक्यातील बहीराने येथील शेतकरी दिपक शिवमन धोंडगे (३६ ) या तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सततची नापिकी, तसेच अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे झालेले नुकसान त्यात हात उसनवारी व बँकेचे कर्ज यामुळे त्रस्त झालेल्या दिपकने आपल्याच शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर शेतकऱ्यास शासकीय कोठ्यातून अनुदान मिळावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व कृषी परिषद मराठा सेवा संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष  भाऊसाहेब चिला अहिरे यांनी केली.