Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक : १२ दुचाकी जप्त

दि . 02/11/2020

मालेगाव शहर व परिसरातून दुचाकी चोरी करणार्‍या राकेश संजय कोळी रा.ओमकार कॉलनी, अयोध्यानगर व अमजद फकीरा शेख रा.देवीचा मळा या दोघा संशयितांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या २ लाख ९५ हजार रूपये किंमतीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकुण १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
पोलिस अधिक्षक सचिन पाटील व अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक प्रविणकुमार वाडीले यांच्या पथकातील पोउनि रामेश्वर घुगे, पोलीस नाईक वाघ, शिपाई नितीन बारहाते, संदीप राठोड, वासुदेव नेर पगार, संजय पाटील यांनी सदर कारवाई केली.
सदर आरोपींनी चोरी केलेल्या दुचाकी धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील जातोडा, पिळोदा याठिकाणी विक्री केल्याने सदर दुचाकी जप्त करण्यात आल्या.