Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल, RAF सह १८०० पेक्षा जास्त पोलिसांनी केले संचलन..

दि . 23/05/2020

भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांचे वतीने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता जाहिर करण्यात आलेला लॉकडाउन दिनांक ३१/०५/२०२० पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. शासनाचे अधिसुचनेत नमुद केल्याप्रमाणे कोणालाही धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळी एकत्र येवन साजरे करता येणार नाहीत.

सध्या नाशिक ग्रामीण घटकातील विविध ठिकाणी विशेषत: मालेगांव शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा प्रशासनाकडुन ११९ कंटेनमेंट झोन जाहिर करण्यात आलेले आहेत. त्याअनूषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून पोलीस अधीक्षक-२, अपर पोलीस अधीक्षक-२, पोलीस उपअधीक्षक- ५, पोलीस निरीक्षक- २२, दुय्यम अधिकारी- ८३ व पोलीस कर्मचारी- १०५८, आरसीपी प्लाटून- ०३, ईन्फोर्समेंट स्कॉड-३ होमगार्ड- ३४ व राज्य राखीव पोलीस बल गटाच्या ६ कंपन्या असा सुमारे १८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी असा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर कायदा व व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी २० पोलीस अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाची १ रॅपिड अॅक्शन फोर्स कंपनी, १५० होमगार्ड दलाचे कर्मचारी असा विशेषत्वाने वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचेकडून आवाहन करण्यात येते की, आजवर ज्याप्रमाणे मालेगांवातील मुस्लीम बांधवांनी रमजानच्या पवित्र महिन्यातील दर शुक्रवारची नमाज घरीच पटण केली. त्याचप्रमाणे जसे शब-ए-बारात कब्रस्थानमध्ये साजरा न करता घरीच साजरा करुन पोलीस प्रशासनास जसे सहकार्य केले तसेच रमजान ईदची नमाज घरीच पटण करुन सहकार्य करावे. सदरबाबत मालेगांव परिसरातील सर्व प्रमुख धार्मिक, राजकिय, सामाजिक, नेत्यांची बैठक दिनांक २१/०५/२०२० रोजी घेतली असता सदर बैठकीस मौलाना मुफ्ती ईस्माईल कासमी (आमदार मालेगांव मध्य), आसिफ शेख रशिद शेख( माजी आमदार),

मौलाना अब्दुल हमिद अजहरी, मौलाना फिरोज आजमी इत्यादी सह प्रमुख मौलाना व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रमजान ईदची नमाज घरीच पठण करावी, असे आवाहन केलेले आहे.

दिनांक २२/०५/२०२० रोजी मौलाना अब्दुल हमिद अजहरी कुल जमात तंजिम), मौलाना शकील फैजी(अहिले हदीस), हाजी युसूफ इलियास(सुन्नी कौन्सील), मौलाना उमरेन रहिमानी (सेक्रेटरी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड), आदी मुस्लिम समाजाचे धार्मिक प्रमुखांनी रमजान ईदची नमाज घरातच पटण करावी. कोणीही ईदगाह अथवा मस्जिद या ठिकाणी नमाज पठण करणार नाही तसेच शासनाच्या आदेशाचे सर्वजण पालन करतील. अशा स्वरुपाचे व्हिडीओ बनवून प्रसारीत करुन जनतेला आवाहन केलेले आहे.

रमजान ईद चे पार्श्वभुमीवर विशेषत्वाने ०४ ड्रोन कैमरा यांद्वारे लोकांचे हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणीही प्रतिबंधक आदेशाचे केल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल. सर्वाना रमजान ईद ग्रामीण पोलीस दलाकडून हार्दिक शुभेच्छा!


ताज्या बातम्या