Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मृत महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह..अन् देवळा तालुक्यात वाढली धाकधूक

दि . 21/05/2020

देवळा: महिला ज्या दवाखान्यात तपासणीसाठी आली होती त्या तपासणी कक्षाची दोन वेळा स्वछता केली. स्वतःला ही संपूर्ण सॅनिटाईज करून घेतले तेव्हापासून संबंधित डॉक्टरने लगेच आपला दवाखाना बंद ठेवल्याने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.मृत महिले कडून कोव्हीड चे संक्रमण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने व मेशी व फुलेंनागर ग्रामपंचायतीचे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले आहे. मेशी गावातील सर्व व्यवहार चार दिवस संपूर्ण बंद ठेवण्यात आले आहेत. 

 मेशी : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान असतांना आजपर्यंत सुरक्षित असलेल्या देवळा तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई स्थित ५५ वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वीच मृत झाल्याने व तिला उपचारासाठी फुलेंनगर येथील नातेवाईकांनी मेशी येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत्यूनंतर  स्वबचा अहवाल पॉझिटीव्ह

महिलेच्या मृत्यू नंतर तिचा स्वबचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने तिच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व डॉक्टर यांना क्वॉरन्टीन केले आहे. फुलेंनगर (वासोळपाडे) येथील नातेवाईकांनी या महिलेला सोमवारी (१७ मे) रात्री उपचारासाठी खाजगी दवाखान्यात आणले होते.संबंधित डॉक्टरांना पेशंट च्या लक्षणांवरून संशय आल्याने त्यांनी लगेच महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याबाबत संदर्भित केले सदरच्या महिलेचा दुसऱ्याच दिवशी (दि १८ मे) मृत्यू झाल्याने तिचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.संबंधित महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली.

 

 


ताज्या बातम्या