Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मक्का सरसकट हमी भावाने खरेदी करण्याची कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांची मागणी ..

दि . 19/05/2020

 राकेश आहेर- शेतकऱ्यांनकडचा अजून 60 ते 70% मका काढायचा बाकी आहे, व्यापारी लूट भावात खरेदी करत असुन मका पिकासाठी जेवढा खर्च झाला आहे तोही निघत नाही.
केंद्रशासन ३८ प्रकारच्या शेतमालाला , कृषीमुल्य आयोगा मार्फत दर वर्षी किमाण आधारभुत किमती निच्छित करत असते त्या मध्ये १३ प्रकारच्या कडधाण्य व गहु ,बाजरी ,मका ,सोयाबीन ,या अन्न धांण्याचा समावेश करण्यात आला आहे ,यात राज्यस्तरीय   कृषी मुल्य आयोगही काही प्रमाणात हस्तक्षेप करुन अधारभुत किमती निश्यित करत असते ,संध्या कोरोणामुळे संचारबंदी च्या कारणास्तव जिल्हा व राज्य अंर्तगत व्यवहार  ३० ते ४० दिवस बंदच होते याचा सर्वाधिक फटका पोल्ट्री  उद्योगाला बसला असुन त्या अनुषंगाने कोंबडी खाद्य म्हणून ,मका या भरड धाण्याचा वापर केला जातो ,परंतु ज्या दिवशी  संचार बंदी घालण्यात आली ,त्या दिवसापासुन मक्या चे खरेदी दर कमी, कमी होत गेले ,मार्च महिन्यात २००० ते २२०० रुपया पर्यत खरेदीचे दर असतांना आज मात्र १००० ते १२००० रुपया पर्यंत दर खाली उतरले आहेत , मका उत्पादकांना किमान अधारभुत किंमत ही मिळणे दुरापास्त झाले आहे ,शासन हमी भावाने मका खरेदी करण्यासाठी पुढे आले आहे हे जरी खरे असले तरी फक्त रब्बी हंगामातील मक्यांचीच खरेदी होणार असल्याचे म्हटले आहे , अजुन शेतकंऱ्याकडे मागिल खरीब हंगामातील भरपुर मका शिल्लक असुन फक्त रब्बी हंगामातील मक्याचीच खरेदी केली जाईल असे म्हणने गैर आहे असे मत 
स्वाभिमाणी शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्नवयक कुबेर जाधव यांनी व्यक्त केले आहे ,शासनाने असा भेद भाव न करता मधल्या काळात हमि भावा पेक्षा कमी दरात खरेदी झालेल्या मक्याची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री ,व कृषी मंत्र्यानकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


ताज्या बातम्या