Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी तब्बल १३ लाखांचा तंबाखू जप्त , स्थानिक गुन्हे शाखा आणि कॅम्प पोलिसांची कारवाई..

दि . 19/05/2020

मालेगावी आज दिनांक १९ मंगळवार रोजी दुपारी ३ च्या सुमारास येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव येथील सुपर मार्केट येथील एस.मोहनलाल अँड ब्रदर्स यांच्या मालकीच्या दुकानात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर येथील स्थानिक गुन्हे शाखा व कॅम्प पोलीस यांनी केलेल्या कारवाईत तंबाखुजन्य पदार्थाचे साठवणूक परवाना नसतांना साडे १३ लाख किमतीच्या गाय छाप तंबाखूच्या २३३ गोण्या जप्त करण्यात आले.जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आदेशानुसार संजय मोहनलाल छाजेड यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील, संदीप दनगहू , सह कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील,सूरज आगे, पो.ह. बागडे, पाटोळे, चव्हाण, घोगडे यांचा समावेश होता.


ताज्या बातम्या