Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळ्याच्या अजंग गावाजवळ गॅस टँकर आणि ट्रॅव्हल्स बसमध्ये अपघात ,अपघातात टँकरचा स्फोट ; 4 जणांचा जळून मृत्यू.

दि . 18/05/2020

▪️बसमध्ये असलेल्या प्रवाशांच्या संख्येबाबत संभ्रम.

धुळे:  नागपूर - सुरत महामार्गावर मुकटी गावाजवळ  ट्रॅव्हल्स आणि गॅस टँकरच्या समोरासमोर  धडकेमुळे हा अपघात झाला असून यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खासगी बस ही धुळ्याकडेयेतहोटी तर टँकर हा जळगांव कडे जात होता. दोन्ही वाहन जाळून खाक झाल्याने वाहनांची आणि मृतांची ओळख पटलेले नाही. नेमके प्रवासी किती होते हे ही अजून स्पष्ट झालेले नाही.  या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला या आगीत दोन्ही वाहन जाळून खाक झाली असून दोघांचा फक्त लोखंडी साचाच फक्त शिल्लक राहिला. आगीचे लोट आणि आगीदारम्यान होणाऱ्या स्फोटांचा आवाज एक ते दोन किलोमीटर पर्यंत पाहता येत होते. आगीच्या लोळात दोन्ही वाहने असल्याने जवळपास कुणीही जाऊ शकणार नाही, अशी स्थिती होती. 

 


ताज्या बातम्या