आदिवासी कन्येचे बंडूकाका बच्छाव यांनी केले कन्यादान..

दि . 17/05/2020
चि. जितेंद्र रामकृष्ण साळुंखे (डोंगराळे) व चि. सौ का.उर्मिला {अश्विनी} सहादु चव्हाण (अजंग) , मालेगाव .यांचा विवाह 17-5- 2020 रोजी निश्चित होता. परंतु सध्याच्या कोरोना लॉक डाऊन मुळे काम धंदा नाही, पैसाअडका नाही , विवाहासाठी लागणारी साधनसामग्री नाही , विशेषतः मुलाच्या मागे उभे राहणारे मामा देखील गुजरात येथे अडकून पडले आहेत. त्यामुळे हा विवाह लांबणीवर पडणार होता. परंतु डोंगराळे गावाचे माजी सरपंच समाधान ठोंबरे यांनी बंडू काकाच्या कानावर घातले त्यांनी सांगितले बंडूकाका काहीतरी मदत करा. मुलाचे मामा गुजरात मध्ये अडकले आहेत नाहीतर हे लग्न लांबणीवर टाकाव लागेल. तेव्हा काकांनी सांगितले मुलाचा मामा मी होतो मुलीचे कन्यादान मी करतो , लग्न खर्च मी उचलतो पण लग्न लांबणीवर टाकू नका. बंडू काकांनी सर्व अडचणींवर मार्ग काढून , विवाहासाठी लागणारी सर्व आर्थिक मदत करून तो विवाह आज दिनांक 17/ 5/ 2020 रोजी शासनाचे सगळे नियम पाळून संपन्न झाला. नवरदेव नवरी सह वऱ्हाडी मंडळींनी मास्क लावलेले होते.. पाच फुटाच्या अंतरावर उभे राहून नवरदेव नवरीला आशीर्वाद दिले . अशापद्धतीने हा आदर्श विवाह पार पडला याप्रसंगी समाधान ठोंबरे (मा सरपंच डोंगराळे) , भायगाव येथील बारा बलुतेदार मित्र मंडळाचे युवानेते संदीप (पिंटू) अहिरे व जनसेवा मंडळ डोंगराळे चे सदस्य आदि उपस्थित होते. बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून असा आदर्श उपक्रम राबविल्याबद्दल "श्री. बंडू काका बच्छाव" यांचे सम्पूर्ण तालुक्यातून कौतूक होत आहे. "मदत करण्याची फक्त इच्छाशक्ती पाहिजे मग संकटात आपला असो किंवा परका" याची प्रचिती "बंडू काकांच्या" या कार्यातून येते.
NewsLetter Sign Up !
Please enter your Email and Name to join.
To unsubsribe please click here ».