Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
म्हाळदे शिवारातील विलगीकरण कक्षातील इमारतींमध्ये चोरट्यांनी मारला डल्ला..

दि . 17/05/2020

जवळपास ५७ हजरांचा मुद्देमाल लंपास

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील करोना ग्रस्त रूग्णांना येथील म्हाळदे शिवारातील घरकूल योजनेच्या इमारतींमध्ये विलगीकरण करण्यात येत असून याच इमारतींमध्ये चोरट्यांनी आपला हात साफ करीत जवळपास ५७ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील महापालिकेने म्हाळदे शिवारातील इमारतींमध्ये शहरातील करोना बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला असून आता यातील रुग्ण इतरत्र हलविण्यात आले आहे. मात्र याठिकाणी रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी असलेले पंखा, पलंग, लाईट आदी व्यवस्था करण्यात आली होती. १३ मे रोजी या इमारतीमधील १८ पंखे, ६० एलइडी बल्ब व इतर साहित्य असा ५६ हजार ८५६ रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशान्वये कर्तव्यावर हजर कर्मचारी स्वप्निल अशोक हिरे यांनी येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


ताज्या बातम्या