Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मेशीत शेतकरी सन्मान दिवस साजरा..

दि . 16/05/2020

देवळा प्रतिनिधी राकेश आहेर-🙏जगावर आणि देशावर कोरोनाचे जे संकट आलेलं आहे त्याविरुद्ध लढा देण्यासाठी डॉक्टर नर्सेस पोलीस ज्या पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत त्याच पद्धतीने शेतकरी सुद्धा नफा तोट्याची पर्वा न करता आपला शेतमाल पुरवतो आहे या बळी राजाचा सन्मान करण्यासाठी अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने 16 मे हा दिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून आज साजरा होतो आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मा राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली  शेतकरी सन्मान दिवस आज साजरा होतो आहे.आज सकाळी ९ वाजता शेतकरी बंधूंनी आपल्या शेतातील अवजारे नांगर,कुदळ,पावडे,विळा पाच मिनिटे हातात धरून राजू शेट्टी यांनी केलेल्या सूचनेला मेशी तालुका देवळा येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे .
    यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, संघटनेचे देवळा तालुका युवा अध्यक्ष तुषार शिरसाठ, विश्वास जाधव, राहुल शिरसाट, दीपक सूर्यवंशी, समाधान गरुड,सह असंख्य शेतकरी यात सहभागी झाले


ताज्या बातम्या