Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पत्रकार दीपक खैरनार यांना जबर मारहाण; अंबासन येथील सरपंच आणि त्याच्या दोघां भावांविरोधात गुन्हा दाखल...

दि . 16/05/2020

जिल्हाभरातून सर्वस्तरातून तिव्रनिषेध कडक कारवाईची मागणी..

सटाणा तालुक्यातील अंबासन येथील निर्भीड पत्रकार दीपक खैरनार यांना गावचे सरपंच, जितेंद्र श्रावण आहिरे व दोघे भाऊ प्रदीप आणि दिलीप यांनी गावातील सावता चौकात गाठून, बेदम मारहाण शिवीगाळ, करून जीवे मारण्याची धमकी दिली. दिपक खैरनार यांनी गावातील  पाणीपुरावठा संदर्भात गावातील लोकांच्या संस्थांची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचाच राग मनात धरून तिघा भावांनी मारहाण केली आहे. निवडणुकीत जनतेच्या हिताच रक्षण करण्याचं आश्वासणाची विसर पडलेल्या लोकप्रतिनिधीला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देणे हे पत्रकाराच कर्तव्य असून, यासाठी भलेही प्रसंगी गावगुंड लोकप्रतिनिधींचा  विरोध पत्करून सत्यपरिस्थिती मांडून जनतेला न्याय मिळवून देण्याच काम करावे लागते. हेच कर्तव्य बजावणारे खैरनार  यांच्यावर सत्तेचा माज आलेल्या सरपंच बांधवांनी प्राणघातक हल्ला करून अकार्यक्षमता सिद्ध केली आहे. खैरनार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा नाशिक जिल्हा, सटाणा, मालेगाव येथील सर्व पत्रकार बांधव, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी जोरदार निषेध केला असून, हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.


ताज्या बातम्या