Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आनंदाची बातमी! साठ टक्के कोरोनाबाधित बरे झाले!!

दि . 15/05/2020

शहरात व जिल्ह्यातील कोरोनाग्रस्थ संख्या ७५९ असली तर आत्तापर्यंत ४५९  रुग्ण बरे झाले आहेत. सर्वाधिक जास्त कोरोनाची लागण झालेल्या मालेगावात आता ३७७ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले.
आठ दिवसांपूर्वीची मालेगाव, तसेच नाशिक जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती झपाटयाने बदलली आहे. 
जवळपास साठ टक्के रुग्ण बरे होऊन परतले आहेत. गेल्या दोन दिवसांत नव्याने दाखल होणाऱ्या संशयितांचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी झाले आहे. 
अर्थात, धोका अजूनही आहेच. काळजी घ्या... 

 


ताज्या बातम्या