Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ना बँड.. ना बाराती....एक विवाह ऐसा भी...

दि . 14/05/2020

मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वऱ्हाडीची उपस्थिती तिथे आलीच..नवरीच्या कलवऱ्यांचं नटनं.. वरमायांचा मानपान..तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी..पण हे सगळं आता थांबलय..त्याला कारणही तसेच आहे..सध्या सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि लॉक डाऊनचा वरचष्मा..पण या सगळ्यातही त्यांनी आपला लग्न सोहळा घरातच उरकला आहे..अर्थात सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच चांदवड तालुक्यातील कानमंडाळे गावचे सरपंच सुधीर भागवत केदारे यांचे चिरंजीव राहुल व नाशिक येथील शैलेंद्र भाऊसाहेब बनकर यांची कन्या कादंबरी यांचा विवाह अगदी साध्या पध्दतीने अवघ्या सात ७ लोकांच्या उपस्थितीत घरातच पार पडला.
सध्या संपूर्ण जगात कोरोना आजाराने धूमाकूळ घातला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने देशात जमावबंदी आदेश आहे. जमावबंदी आदेशामुळे विविध सण समारंभांवर देखील बंधन आली आहेत. याचा परिणाम लग्न समारंभ देखील झाला. पाल्याचा विवाह स्मरणात रहावा यासाठी अनेक पालकांनी यावर्षी ठरलेली विवाह तारीख रद्द करत पुढच्या वर्षी विवाह करण्याचे ठरविले. परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करत केदारे व बनकर परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला. या विवाहासाठी भाऊबंदकी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना न आमंत्रण देता वधू व वराच्या आई वडीलांनीच पार पाडला. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाचे कौतुक होत असून चांदवड सह परिसरात एकच चर्चा आहे, "एक विवाह ऐसा भी।" या विवाहामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे
----------
प्रतिक्रिया :  विवाहाची तारीख पूर्वी ठरलेली होती. संचारबंदी असल्याने विवाह पुढे ढकलण्याचा अनेकांनी सल्ला दिला. शासन आदेशाचे पालन करून हौसमौजेला फाटा देऊन घरातच विवाहाचा निर्णय घेतला.
- सुधीर केदारे, सरपंच, कानमंडाळे

--------


ताज्या बातम्या