Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगवकरांसाठी धक्कादायक बातमी, मालेगावचे महापालिका आयुक्त व सहा.उपायुक्त यांचा अहवाल आला कोरोना संसर्ग बाधीत..

दि . 13/05/2020

मालेगवकरांसाठी धक्कादायक बातमी,  मालेगावचे महापालिका आयुक्त व सह.उपायुक्त यांचा अहवाल आला कोरोना संसर्ग बाधीत..

- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीत होते महापालिका आयुक्त..

- अहवाल समजताच आयुक्त बैठकीतून बाहेर...

-  आरोग्य मंत्र्यांसमवेतच, कृषी मंत्री दादा भुसे , लोकप्रतिनिधी व  विविध शासकीय अधिकारी होते बैठकीत..

पालिका आयुक्त व सहा.उपायुक्त करोना बाधित

पालिका प्रशासनात खळबळ ; आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत सदर बाब उघड 

मालेगाव :- शहरात करोना बधितांची संख्या वाढत असतांना आता येथील महापालिका आयुक्त व सहा.उपायुक्त (स्वच्छता) यांना करोनाची लागण झाल्याने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अमरावती येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून नेमणूक असलेल्या या अधिकाऱ्याची नुकतीच येथील आयुक्त पदी नियुक्ती झाली होती. 

संपूर्ण मालेगाव शहर हे करोना महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. शहरात ६०० च्या घरात या विषाणूचे रुग्ण असून यात अनेक डॉक्टर व पोलीस कर्मचा-यांचा देखील समावेश आहे. आता यात महापालिका आयुक्त व उपायुक्त (स्वच्छता) यांना देखील बाधा झाल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच आयुक्त व कृषिमंत्री दादा भुसे यांनी करोना पिडीत रुग्णांची भेट घेतली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे मालेगाव शहरातील आढावा घेण्यासाठी दाखल झाले असून त्यांच्या बैठकीत सदर बाब उघडकीस आली असून आयुक्त यांनी तत्काळ बैठकीमधून काढता पाय घेतला.


ताज्या बातम्या