Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात ड्युटी बजावणाऱ्या कोरोना वॉरियर्स पैकी संपूर्ण पोलिसांना रोग प्रतिरोधक शक्ती वाढविण्याचा काढा तीन दिवस विनामूल्य वाटप..

दि . 11/05/2020

अतुल्य आयुर्वेद, मालेगाव आणि विचित्र सेना यांचे तर्फे कोरोना वॉरियर्स पैकी संपूर्ण मालेगावात कार्यरत  पोलिसांना आजारी पडू नये म्हणून रोग प्रतिरोधक शक्ती वाढविण्याचा काढा तीन दिवस विनामूल्य देण्यात आला. रोज 2500 पोलिसांना सदर काढा बंद  सॅशेट्स पद्धतीने  ( रेडी टू  युज ) देण्यात आला. पोलिसांना  आजाराची लागण होऊ नये म्हणून हा हा रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा काढा आयुष्य मंत्रालयातर्फे सुचविण्यात आला होता. यात योग्य ते स्थानिक बदल करण्यात आले. मा. संदीप घुगे (Addl. S.P सो . ) यांचे   सहयोगाने सदर कार्यक्रम राबवण्यात आला  .  
काढा बनविण्याचे काही आयुर्वेदिक साहित्य प्रथम दिवशी तेजस मसाले वाला यांचे तर्फे देण्यात आले तर गुळवेल अजय कळमकर, खडकी यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिले. सॅशेट्स बनविण्याचे काम  श्री निलेश बिरारी यांनी करुन दिले . काढा बनविणे हे मोठे जिकरीचे काम काम असते. ते रोज दीडशे लीटर  काढा बनविण्याचे काम देविदास गायकवाड, अनिल चंडालिया, ज्ञानेश्वर वाघ व सौ वाघ आणि ज्योती ताई यांनी केले. काढा गार करून व सॅशेट्स बनवून वितरण करेपर्यंत ची कामे अतुल्य आयुर्वेद परिवार यांनी केले.
यातील फार्मूला बनविण्याचे काम डॉ. अपश्चिम सुगन बरंठ, अतुल्य आयुर्वेद चे संचालक व प्रभा आयुर्वेद महाराष्ट्र सचिव यांनी केले.  उद्या पासून 3000 पोलीस व सफाई कर्मचारी यांना नासा तैलम ही  देण्यात येणार आहे .  सदर काढा अतुल्य आयुर्वेद जवळील जोशी वाडा परिसरातील २०० व्यक्तींना देखील देण्यात आला . त्या सर्वांच्या मागणीवरून  ह्या काढ्या चे चूर्ण घरी उकाळून पिण्या साठी सामान्य जनते साठी अतुल्य आयुर्वेद येथे अत्यल्प दरात  उपलब्ध केले आहे  .


ताज्या बातम्या