Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोनाच्या संकटात समाज्यासाठी जीवमुठीत घेऊन रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला ; गावगुंडांना एकत्र फिरण्यावरून हटकल्याच्या रागावरून पोलिसांवर केला हल्ला..

दि . 11/05/2020

कोरोनाच्या लढाईत जीव मुठीत घेऊन समाजाच्या रक्षणासाठी रस्त्यावर झटणाऱ्या पोलीसांवरील हल्ले काही कमी होण्याच नाव घेत नाहीये मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथील पोलीस कर्मचाऱ्यांवर माथेफिरुकडून कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतांनाच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या आमोदे फाटा येथे रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हटकल्याचा राग आल्याने गावगुंडांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे यात दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.

कोरोनाच्या संकटात आपल्या परिवाराचा विचार न करता समाजाच्या रक्षणासाठी रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले कमी होण्याच नाव घेत नाहीये एकीकडे गृह मंत्र्यांकडून अश्या प्रकारे हल्ले सहन केले जाणार नसल्याच म्हणल जात आणि दुसरीकडे जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांवर टवाळखोरांकडून हल्ले होतात तेव्हा सर्वात धक्कादायक म्हणजे स्वतः वरिष्ठ अधिकारीच हल्ल्यात जखमी झलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहायच सोडून कर्मचाऱ्यांचे मनोबल खचिकर करत असल्याच दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या आमोदे फाटा येथे रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काही टवाळखोरांना हटकले असता या टवाळखोरांना हटकल्याचा राग आल्याने या वाटळखोरांनी गावात जाऊन आणखी काही गावगुंडांना आपल्या सोबत आणले व हटकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर जवळील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून याबाबद या गावगुंडांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्याबाबद वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कचराई होत असल्याच समोर आल आहे.

अश्या परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याची गरज असतांना वरिष्ठांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होऊ नये अशी भाबडी आशा रस्त्यावर जीव धोक्यात घालून पहारा देणारा पोलीस कर्मचारी करीत आहे.


ताज्या बातम्या