Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
करोनाला हरवण्यासाठी ना.भूसेंचे देवाला साकडे? अचानक मंदिरात ठाण मांडून बसल्याने चर्चांना उधाण..                                                                                                 

दि . 09/05/2020

मालेगाव  : शहरात करोना विषाणूने कहर केला आहे. वाढती रुग्ण संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. वाढती रुग्ण संख्या व उपाय योजनेचा अभाव यामुळे आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा उघड होत आहे. या परिस्थितीत शनिवारी दुपारी राज्याचे कृषिमंत्री व मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी अचानक त्यांच्या संपर्क कार्यालयासमोरील मंदीरात ठाण मांडून बसल्याने शहरात चर्चाना उधाण आले आहे.

संपूर्ण देश करोना महामारीच्या विळख्यात सापडला आहे. यात मालेगाव सारख्या छोट्या शहरात तर या विषाणूने  कहरच केला आहे. मालेगाव शहरात ८ एप्रिलला पहिला रूग्ण सापडल्यानंतर शहराच्या रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ झाली. शहरात एका महिन्यातच रुग्णांचा आकडा ५०० च्या घरात जाऊन पोहचला आहे. प्रशासन या सगळ्या परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करीत असले तरी अद्याप परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ना.भुसे आपल्या संपर्क कार्यालयाच्या समोरील मंदीरात ठाण मांडून बसल्याने चर्चेला उधाण आले आहे. सर्व माध्यम प्रतिनिधी याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत ना. भुसे यांच्याकडून भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काही बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शहरातील करोनाच्या परिस्थितीला प्रशासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्यानेच आता शेवटी देवालाच करोनामुक्त मालेगाव करण्यासाठी साकडे घालावे म्हणून ना. भुसे मंदिरात ठाण मांडून बसल्याची चर्चा आहे. मालेगाव शहर करोना मुक्त व्हावे यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी मंदिरात बसलो असल्याचे ना.भुसे यांनी यावेळी कासमादेशी बोलताना सांगितले.


ताज्या बातम्या